Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिव्यांगांना मदत करा जनजागृती करीत असलेल्या जर्मनी येथील स्टिफन वृर्मान नाशिक जिल्ह्यात दाखल

disabled
, शनिवार, 27 जानेवारी 2024 (09:32 IST)
दिव्यांगांना मदत करा, त्यांना कृत्रिम अवयव रोपण करा यासाठी जनजागृती करीत असलेल्या जर्मनी येथील स्टिफन वृर्मान यांचे नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जवळ नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनच्या वतीने मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करून सत्कार करण्यात आला.
 
ज्या व्यक्ती ना हात, पाय नसल्याने दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते त्यांना जर कुत्रिम अवयव रोपन केले तर ते स्वतःची कामे पुन्हा करू शकतात. याबाबत जनजागृती करण्यासाठी जर्मनी येथील स्टिफन वृर्मान यांना अपघात होऊन नंतर अर्धांगवायू झाल्याने चालता येत नसल्याने विशिष्ट्य पद्धतीच्या सायकलवर झोपून सातारा येथून मुबंई पर्यंत ते प्रवास करीत आहेत.
 
सातारा येथून निघाल्यानंतर काल नारायणगावला मुक्काम करून आज सकाळी ते नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे नाशिक सायकलिस्टस फाउंडेशन च्या वतीने मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी नागरिकांनी भारत माता कि जय, वंदे मातरमच्या घोषणा दिल्या.
 
यावेळी नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे, उपाध्यक्ष डॉ मनीषा  रौंदळ , एस, पी, आहेर, विनायक वरुंगसे, मयूर कुलकर्णी, रवींद्र भेला आदी सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाहतूक पोलीस निरीक्षक दिनकर कदम व कर्मचारी यांनी योग्य वाहतूक सुरळीत करून त्यांना मदत केली.

Edited By -  Ratnadeep ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अंगणवाडी सेविकांचा संप मागे