गोवा येथून नाशिकला विक्रीसाठी आणण्यात येणारा तब्बल एक कोटी रुपयांचा मद्य साठा नाशिक उत्पादन शुक्ल विभागाचे अधीक्षक मनोहर अंचुळे यांच्या पथकाने सापळा रचून पकडला. येवला टोल नाक्यावर खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सिरॅमिकच्या भांड्यांच्या गाडीत चोर कप्पा बनवून ही वाहतुक केली जात होती.
कोरोना काळात मोठ्या प्रमाणात दारु येथून तेथे अवैध पद्धतीने नेण्याचे प्रकार सुरु आहे. पण, राज्य उत्पादक शुल्क विभागाने कारवाई केल्यामुळे अवैध दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.