Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 3 April 2025
webdunia

अंत्यसंस्काराबाबत शहर व शहराबाहेरील हा संघर्ष थांबवा !

Ahmednagar news
, मंगळवार, 27 एप्रिल 2021 (22:12 IST)
अहमदनगर  :-आजवर नगर शहरातील अमरधाममध्ये कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते. पण काल अचानक नगर शहराबाहेरील मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यास नकार देण्यात आला. हा अन्याय असून सर्वांवर अंत्यसंस्कार करण्यात यावेत.
 
शहर आणि शहराबाहेरील असा वाद तातडीने थांबवावा, असे निवेदन जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी प्रांताधिकारी यांना दिले.नगर शहरात दररोज कोविडमुळे सुमारे ५५ ते ६० व्यक्तींचे मृत्यू होत आहेत. यापूर्वी कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार महानगरपालिकेमार्फत नगर येथील अमरधाम येथे करत आलो.
 
परंतु रविवारी शहराबाहेरील नागरिकांचे अंत्यसंस्कार थांबवण्यात आले. कुणाच्या आदेशाने हे थांबवण्यात आले, असा सवाल त्यांनी केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लसीकरणात महाराष्ट्राने रोवला मैलाचा दगड; दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे