Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभ्यास करा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षेच्या तारखा जाहीर

अभ्यास करा,  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षेच्या तारखा जाहीर
, मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (16:23 IST)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. २ जानेवारी २०२२ पासून २९० पदांसाठी पूर्व परीक्षा होणार आहे. तर मुख्य परीक्षा ७, ८ आणि ९ मे २०२२ रोजी होणार आहेत. यासाठी आज ५ ऑक्टोबरपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तर २५ ऑक्टोबर २०२१ रात्री ११.५९ पर्यंत उमेदवारांना अंतिम अर्ज करता येणार आहे. 
 
राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा २०२१ ची जाहिरात महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार, आयोगाकडून उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, सहायक राज्य कर आयुक्त, गटविकास अधिकारी आणि तत्सम पदे, वित्त व लेखा सेवा सहायक संचालक, उद्योग उपसंचालक, सहायक कामगार आयुक्त, उपशिक्षणाधिकारी आणि तत्सम पदे, कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी अशी एकूण २९० रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरातील ३७ जिल्हा केंद्रांवर पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र या परीक्षेसाठीची अर्ज आणि शुल्क प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
 
यात खुल्या प्रवर्गासाठी ५४४ रुपये, तर राखीव प्रवर्गासाठी ३४४ रुपये शुल्क निश्चित करण्यात आली. विद्यार्थ्यांना यासंदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in या वेबसाइटवर भेट द्यावी.
 
जाहिरातीमध्ये नमूद केलेली संवर्गातील पदसंख्या आणि आरक्षणामध्य़े सरकारच्या संबंधित विभागाच्या आदेशानुसार बदल केले जाऊ शकतात. मात्र सध्याच्या जाहिरातीमध्ये नमूद संवर्गांपैकी काही मागास प्रवर्ग आणि समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध नाहीत. उमेदवारांसाठी या परीक्षेलाठी अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, परीक्षेचे नियोजन, अभ्यासक्रम आणि इतर सर्व गोष्टींची सविस्तर माहिती आयोगाच्या www.mpsc.gov.in या वेबसाईटनर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे उमेदवारांनी अर्ज भरावा.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खळबळजनक ! काँग्रेस शहर अध्याक्षाच्या घरात रंगला जुगाराचा अड्डा, 14 जणांना ठोकल्या बेड्या