Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिकमध्ये दुर्मिळ कासवावर यशस्वी उपचार

tortoise
, शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (08:55 IST)
नाशिकच्या मखमलाबाद-मुंगसरा मार्गावरील दरी मातोरी परिसरात ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये सापडल्याने पूर्ण वाढ झालेल्या दुर्मिळ कासव जखमी  झाले होते. संबंधित शेतकऱ्याने ही घटना नाशिक वनविभागाने (पश्चिम विभाग) यांना दिली. त्यांनतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत या कासवाला ताब्यात घेतले. यानंतर ईको-एको फौंडेशनचे सहकारी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या कासवावर उपचार केले. 
 
याबाबत अधिक माहिती अशी की,२३  जुलैला दरी मातोरी परिसरात एक शेतकरी शेतीची मशागत करत होते. याचवेळी दुर्मिळ श्रेणीतील कासव मातीखाली होते. यानंतर ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये हे कासव अडकले. यात कासवाचे कवच फुटले. यानंतर हे कासव इको इको फाउंडेशनकडे उपचार आणि पुनर्वसनासाठी सुपूर्द करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी सचिन वेंदे आणि डॉ संदिप पवार यांनी जखमीवर तब्बल दोन तास यशस्वी शस्त्रक्रिया केली. कासवाची तब्बेत स्थिर आहे आणि उपचारांना त्याने चांगला प्रतिसाद दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बस चालवताना एसटी ड्रायव्हरला हार्ट अटॅक, तरीही 25 प्रवाशांचे प्राण वाचवले