Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आमची संस्कृती आहे, की थोरल्या माणसाला बघितलं की पाया पडायचं

आमची संस्कृती आहे, की थोरल्या माणसाला बघितलं की पाया पडायचं
, गुरूवार, 10 नोव्हेंबर 2022 (08:07 IST)
पद्मश्री डॉक्टर सुधा मूर्ती ह्या सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून त्यांनी 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये भाग घेतला होता आणि या शो मधून मिळालेली सर्व रक्कम बापार्डे कॉलेजच्या उभारणीसाठी या शिक्षण संस्थेत देणगी स्वरूपात दिली होती. आज, बुधवारी बापार्डे येथील नव्याने उभारण्यात आलेल्या कॉलेजचे उद्घाटन पद्मश्री डॉ. सुधा मूर्ती यांच्या हस्ते झाले. दरम्यान, सिंधुदुर्ग दौऱ्यात त्यांनी पत्रकारांशी बोलताना संभाजी भिडेंच्या पाया पडल्याबद्दलचं स्पष्टीकरणही दिलं.
 
"त्यांचं पर्सनल मत मला माहिती नाही, पण ते थोरले माणूस आहेत, ही इज एन ओल्ड मॅन, आमची संस्कृती आहे, की थोरल्या माणसाला बघितलं की पाया पडायचं, त्यांचं मत काय, मतभेद काय, त्यांच्याशी मी काही बोललेच नाही त्याबद्दल" असं सुधा मूर्तींनी सांगितलं. "ते म्हणाले तुमचा टाईम द्या, मी म्हटलं माझ्याकडे वेळ नाही, मी खूप बिझी आहे, फेब्रुवारी-मार्चमध्ये बघते एवढंच, त्यांच्याबद्दल मला काहीही माहिती नाही, पेपरमध्ये नि ट्विटरमध्ये आलं तेव्हा माहिती झालं" असंही सुधा मूर्तींनी सांगितलं.
 
‘संवाद लेखकाशी’ उपक्रमांतर्गत सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात सुधा मूर्ती यांची मुलाखत घेण्यात आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, त्यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्या त्यांच्या पायाही पडल्या होत्या. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याविषयी आयोजकांकडून स्पष्टीकरणही देण्यात आलं. सुधा मूर्तींच्या कार्यक्रमाचं नियोजन सुरू होतं. तेव्हापासून दिवसाला भिडेंकडून दोन तीन फोन येत होते, असा दावा यात करण्यात आला होता. आता, स्वत: सुधा मूर्ती यांनी संभाजी भिडेंबद्दल आपणास काहीही माहिती नाही, असे म्हटले आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संजय राऊत- आम्ही लढणारे आहोत, लढत राहू