Publish Date: Fri, 10 Aug 2018 (16:04 IST)
Updated Date: Fri, 10 Aug 2018 (16:10 IST)
प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबईत चुनाभट्टी येथे गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात झाला आहे. सुदैवाने सुधीर गाडगीळ यांना कोणतीही दुखापत झालेली नसून ते सुखरुप आहेत. चुनाभट्टी येथे चढावर पुढच्या गाडीने अचानक ब्रेक दाबल्याने हा अपघात झाला. चढावर पुढची गाडी अचानक थांबल्यानं मागून येणाऱ्या चार गाड्या एकमेकांवर आदळल्या. अपघातात सुधीर गाडगीळ यांच्या गाडीचं नुकसान झालं आहे.