काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना भाजपमधून जोरदार विरोध होत असून, त्यांच्या भाजप प्रवेशाच्या अडचणीत मोठी वाढ झाली असल्याचे समोर येते आहे. अहमदनगरमधील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाला विरोध केला आहे. कार्यकर्त्यांनी मुंबईंध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला आहे. मुंबईतील भाजप कार्यालयात राज्यातील महत्वाच्या नेत्यांची बैठक होती, बैठकीसाठी राज्यभरातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील देखील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते बैठकीसाठी आले आहेत. या सर्वांनी सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाला जोप्रदार विरोध केला. त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच सुजय विखे पाटील यांच्या प्रवेशावरुन आपला राग व्यक्त केला. त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनाच पुन्हा उमेदवारी द्यावी अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. राधाकृष्ण विखे पाटील कॉंग्रेसचे नेते आहेत तर आघाडीचे जागा वाटप जेव्हा झाले तेव्हा ही जागा राष्ट्रवादीला मिळाली आहे, तर राष्ट्रवादीने ही जागा सोडायला नकार दिला त्यामुळे सुजय यांनी भाजपा नेते गिरीश महाजन यांची भेट घेतली होती, त्यामुळे ते कॉंग्रेस सोडून भाजपा प्रवेश करतील असे चित्र होते. त्यामुळे नगर येथील भाजपा कार्यकर्ते चिडले असून सुजय यांना प्रवेश आणि उमेदवारी देऊ नका म्हणून जोरदार विरोध केला आहे.