Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुषमा अंधारेनी सांगितलं शिंदे गटातील संपर्कात असलेल्या आमदाराचे ‘नाव’

sushma andhare
, शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2022 (08:09 IST)
जळगाव : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटात खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने पुन्हा एकदा चर्चांना उधान आले आहे. शिंदे गटात काही आमदार नाराज असून काहीजण संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच शिंदे गटात असलेले आमदार संजय शिरसाट आमच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने आता राजकीय उधान आले आहे. सुषमा अंधारे या सध्या ‘महाप्रबोधन यात्रे’ निमित्त जळगावात असून पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.
 
काय म्हणाल्या अंधारे?
“शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि आम्ही संयमित भाषेचा वापर करत आहोत. आम्ही टीका करताना कधीही  पातळी सोडणार नसल्याचे म्हटले. बंडखोरांना माघारी परता येईल असे संकेत देताना त्यांनी परतीचे दोर आमच्याकडून कापले गेले नसल्याचे म्हटले. आमदार संजय शिरसाट हे शिंदे गटात अस्वस्थ असून त्यांना पश्चाताप होत आहे. ते आमच्या संपर्कात आहेत” असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
 
भाजपसहित किरीट सोमाय्यांवर लक्ष
सीबीआयचा भाजपकडून दुरुपयोग सुरू आहे. भाजपमध्ये असलेल्या कोणत्याही भ्रष्टाचारी नेत्याविरोधात कारवाई केली जात नसल्याचे त्यांनी म्हटले. कोरोना काळात जिल्ह्यात झालेल्या अपहाराबाबत कोणतीही कारवाई केली जात नाही. किरीट सोमय्या यांची ई़डीशी जवळीक आहे. त्यांनी पाचोरा येथील जमीन आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावे अशी मागणी अंधारे यांनी केली आहे.
 
राणा-कडू वादावर भाष्य
“बच्चू कडू हे लढाऊ आणि स्वाभिमानी आहेत. त्यांच्यावर आरोप होणे हे चुकीचे आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे दु:ख होणे हे अपेक्षित आहे. मात्र, रवी राणा हे उथळ व्यक्तीमत्त्वाचे असून चर्चेत राहण्यासाठी ते सतत काहीतरी बोलत असतात” अशी टीका देखील अंधारे यांनी केली. 
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक मध्ये बँकेत धाडसी चोरी; 17 लाख रुपये नेले चोरून