Publish Date: Tue, 20 Nov 2018 (17:28 IST)
Updated Date: Tue, 20 Nov 2018 (17:29 IST)
पुण्यातल्या वारजे येथील सिंहगड आरएमडी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये काम करत असलेल्या सूजर बाळासाहेब माळी या प्राध्यापकाने आपली अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षणाची प्रमाणपत्रे जाळली आहेत. थकलेले वेतन मागितले म्हणून संस्थेने नोकरीवरुन कमी केल्याची नोटीस दिल्याने संतप्त झालेल्या प्राध्यापकाने हे कृत्य केले. जवळपास वर्षभराचे वेतन मिळालेले नाही. घरी आई, वडील, पत्नी आणि लहान मुलगा असे कुटुंब आहे. मात्र, वेतन मिळत नसल्याने आर्थिक, मानसिक ओढाताण होत आहे. थकलेले वेतन मागितले म्हणून संस्थेने नोकरीवरुन कमी केल्याची नोटीस दिली.