Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'जय भवानी' ही घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली होती - प्रकाश आंबेडकर

'जय भवानी' ही घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली होती - प्रकाश आंबेडकर
, मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (09:34 IST)
'जय भवानी' ही घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली होती असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
 
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या अधिकृत लेटरहेडवर भवानीचं चित्र असल्याचंही सांगितलं.
 
त्यांनी म्हटलं, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काही ऐतिहासिक तथ्य समोर येणे गरजेचे आहे. आंबेडकरी चळवळ आणि शिवाजी महाराज यांचं नातं जुनं आहे. 'जय भवानी'ची घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली."
 
परळ येथील दामोदर सभागृहात बाबासाहेबांना भेटण्यासाठी येणारे लोक एकमेकांना जय भवानी म्हणत अभिवादन करायचे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
 
महाडच्या सत्याग्रहाच्यावेळी बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि गांधीजींची प्रतिमा ठेवली होती. यावेळी दासगाव ते महाडपर्यंत निघालेल्या जमावाने जय जिजाऊ आणि शिवाजी महाराजांचा जयजयकार केला होता, असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कुटुंबातील 5 जणांनी एकत्रच घेतलं विष