Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवसेना आमदार संजय राठोड यांना पक्षाशी केलेली गद्दारी महागात पडेल

शिवसेना आमदार संजय राठोड यांना पक्षाशी केलेली गद्दारी महागात पडेल
, बुधवार, 29 जून 2022 (08:06 IST)
जिल्ह्यात शिवसेना आमदार संजय राठोड यांना पक्षाशी केलेली गद्दारी महागात पडेल असा ईशारा देत वणी येथे शिवसैनिक रस्त्यावर उतरले. बंजारा समाजातील एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड सहभागी असून त्याचे पुरावे आता बाहेर काढू व राठोड यांना वणी मतदारसंघात पाय ठेऊ देणार नाही असा ईशारा यावेळी जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी दिला. राठोड यांनी स्वार्थाचे राजकारण करीत जिल्ह्यात दुसरा शिवसेनेचा आमदार होऊ नये म्हणून कारस्थान केले, ते मुळातच बेईमान असून आता पक्षप्रमुखांसोबत त्यांनी गद्दारी केल्याने त्यांना माफ करणार नसल्याचे यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले, यावेळी संजय राठोड, पालकमंत्री संदीपान भुमरे, व तानाजी सावंत यांच्याविरुद्ध यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राष्ट्रपती निवडणूक: भाजपसाठी त्यांचा राष्ट्रपती बनवणं किती सोपं?