राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या (municipal corporation elections) पार्श्वभूमीवर राजकारण पुन्हा एकदा तापू लागले आहे. शनिवारपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्या पाठोपाठ आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) हे देखील दिल्लीत दाखल झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील भाजपमधील (Maharashtra BJP) प्रस्तावित आणि व्यापक संघटनात्मक फेरबदलांचे संकेत मिळू लागले आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय पातळीवर महाराष्ट्रातील भाजपचे (Maharashtra BJP) प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय जवळपास पक्का झाला असला तरी तातडीने त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता कमी असल्याचे समजते.
शनिवारी चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) तसेच काही भाजप खासदारांशी खलबते केली. तर रविवारी संध्याकाळी फडणवीस आणि दरेकर दिल्लीत पोहोचले. अमित शहा (Amit Shah) यांच्याशी रात्रीच फडणवीस यांनी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजप मनसे युती (BJP-MNS alliance) संदर्भात अनेक दिवसापासून चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप कोणीही उघड भूमिका घेतली नाही.
Bombay High Court | विवाहित महिलेच्या अंगावर प्रेमपत्र फेकणे हा विनयभंगच; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका (Mumbai Municipal Corporation election) समोर ठेऊन राज्यातील भाजप नेतृत्वाने मनसे बरोबर युती करण्याची चर्चा अंतिम टप्प्यात आणली आहे. मात्र, लवकरच उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मनसे बरोबर युती करायची कि नाही या द्विधा मनस्थितीत केंद्रीय भाजप नेतृत्त्व अडकले आहे.
दरम्यान, भाजपचे राज्यातील खासदार आणि मंत्री यांच्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम ज्येष्ठ भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्याकडे आज होणार आहे. यावेळी चंद्रकांत पाटीलही उपस्थित राहणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमात भाजपाध्यक्ष जे पी नड्डा (J. P. Nadda) आणि प्रसंगी अमित शहा हेही सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आधी निवडणूक, मग युती
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीत सपा नेते अखिलेश यादव
(Akhilesh Yadav) आणि काँग्रेस यांच्यासह विरोधक भाजप-मनसे युतीवरून भाजपविरुद्ध
वातावरण तयार करू शकतात. त्याचा भाजपला फटकाही बसू शकतो त्यामुळे उत्तर प्रदेशच्या
निवडणुका जिंकल्यानंतर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-मनसे युतीला अधिकृत स्वरूप द्यावे, तोपर्यंत राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी मागच्या दाराने सामंजस्य ठेवावे असा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाने भाजप राज्य नेतृत्वासमोर ठेवला आहे. या सर्व घटनाक्रमात भाजपच्या मदतीला काँग्रेसच्या एका खासदाराचा जवळचा नातेवाईक धावून आल्याची माहिती समजते.