Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 15 February 2025
webdunia

भाविकांनी भरलेली बोट उलटली,जलतरणपटूंच्या सक्रियतेने जीव वाचला

भाविकांनी भरलेली बोट उलटली,जलतरणपटूंच्या सक्रियतेने जीव वाचला
, मंगळवार, 15 मार्च 2022 (17:29 IST)
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील चित्रकूट येथील भारत घाटावर भीषण अपघात टळला. सुमारे तीन डझन यात्रेकरूंना घेऊन जाणारी बोट उलटली. मात्र सर्व भाविक नशीबवान असल्याने बचावले. हे भाविक महाराष्ट्रातील असल्याचे सांगण्यात येत आहे. हे लोक मंदाकिनी नदीच्या काठी वसलेल्या चित्रकूटला भेट देण्यास आले होते.  
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नयागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चित्रकूट येथील भारत घाट येथे घडली . 35 भाविकांना घेऊन एक बोट घाटाकडे जात होती. घाटाजवळ प्रवाशांना उतरवत असताना, तोल गेल्याने बोट उलटली. आजूबाजूला उपस्थित पोहणारे आणि इतर लोकांनी तत्काळ सक्रियता दाखवून सर्व भाविकांना सुखरूप वाचवले. 
घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले . बोटीतील सर्व यात्रेकरू महाराष्ट्रातील असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे लोक चित्रकूटला भेट देण्यासाठी आले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महागाईचा दणका, आता चिकन महागलं