Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिक येथे जळून खाक झालेल्या मृतदेहाची ओळख डीएनएच्या सहाय्याने पटविण्यात आली

death
, सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (15:29 IST)
८ ऑक्टोबर रोजी घडलेल्या ट्रॅव्हल्स अपघातात पेटलेल्या बसमध्ये जळून खाक झालेल्या मृतदेहाची ओळख डीएनएच्या सहाय्याने पटविण्यात आली. मृतक इसम वसारी (ता.मालेगाव) येथील मनिष यादव इंगळे (३६) हा असल्याचे निष्पन्न झाले.
 
मनिष इंगळे हे नाशिक येथे त्यांच्या नातेवाईकांकडे जाण्याकरिता मालेगाव येथून ७ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या केबीनमध्ये बसून प्रवासाला निघाले होते. त्यांच्या रितसर तिकीट नव्हते; तर चालक, वाहकास नेहमीप्रमाणे पैसे देऊन ते प्रवास करत होते. दरम्यान, ८ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास नाशिक येथे चिंतामणी ट्रॅव्हल्सने ट्रकच्या डिझेल टॅंकला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात बसला आग लागली. या घटनेत इतर प्रवाशांसोबतच मनिष इंगळे यांचाही होरपळून निघाले. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्यास विलंब झाला, अशी माहिती प्राप्त झाली.
 
मुलाचा डीएनए झाला मॅच
मनिष यादव इंगळे यांच्या मुलाचा डीएनए जळालेल्या मृतदेहाशी मॅच झाल्याने ओळख पटू शकली. दरम्यान, १२ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृतदेह वसारी येथे आणून शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मनिष इंगळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व आई-वडिल असा परिवार आहे. या घटनेमुळे या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Edited By - Ratandeep Ranshoor  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दोघे लाचखोर लष्करी अधिकारी ‘कॅट्स’चे नाहीत