राष्ट्र्वादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण संस्थांना भेटायला बोलावले आहे. मात्र, केतकी चितळे प्रकरण, अमोल मिटकरी यांच्या विधानामुळे वाद पेटला आहे. त्यामुळे ब्राह्मण महासंघाने शरद पवार यांच्या भेटीचे निमंत्रण नाकारलं आहे.
या बैठकीला आमचा कोणताही पदाधिकारी जाणार नाही, अशी भूमिकाच महासंघाने घेतली आहे.
शनिवारी 21 एप्रिल रोजी सायंकाळी शरद पवार यांनी ब्राह्मण संस्थांना भेटायला बोलावलं आहे. गेल्या 40 वर्षात पवार यांनी पहिल्यांदाच असं चर्चेला बोलावलं आहे. ज्यांच्या मध्यस्थीने निरोप आले आहेत त्यांच म्हणणं असं आहे की, तुम्ही सर्वांनी येऊन तुमच्या नाराजीच कारण सांगावं, असा दावा ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केला आहे.
"पवारांना पूर्ण कल्पना आहे की, आपली नाराजी का आहे. समर्थ रामदास, कोंडदेव, गडकरी पुतळे, पुणेरी पगडी,संभाजी ब्रिगेड,श्रीमंत कोकाटे,बाबासाहेब पुरंदरे हे जुने विषय जरा बाजूला ठेवू .पण अगदी परवाच्या प्रकरण नंतर त्यांनी आमदार अमोल मिटकरी यांना शब्द माघार घ्यायला सांगायचं होतं.
"पण उलट दुसऱ्या दिवशी त्यांनी शाहू महाराज आणि ज्योतिष यांची गोष्ट सांगितली, त्याच व्यासपीठावर त्यांच्याच उपस्थितीत भुजबळ यांनी पुरोहित हे धंदा करतात (व्यवसाय नाही ) हा शब्द वापरत पुन्हा टिंगल केली, आणि आरक्षणाचं चुकीचं उदाहरणं दिले," असंही दवे म्हणाले.