Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भीषण अपघातात कार 400 फूट दरीत कोसळली

भीषण अपघातात कार 400 फूट दरीत कोसळली
, गुरूवार, 10 मार्च 2022 (17:36 IST)
कोल्हापूर-रत्नागिरी  महामार्गावर आंबाघाटात आज गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात कार 400 फूट दरीत कोसळली. त्यातील प्रवाशांना वाचविण्याचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु असून अपघातग्रस्तांना गाडीतून बाहेर काढण्याचे काम अद्याप साखरपा पोलीस आणि स्थानिक लोकांच्या मदतीने सुरु आहे. हा अपघात आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास झाला. कार मध्ये किती लोक होते अद्याप हे समजू शकले नाही. अपघाताचे कारण अद्याप कळाले नाही. पोलीस आणि स्थानिक लोक अपघातग्रस्त लोकांना बाहेर काढण्यात लागले आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र ला जोडणारा कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर आंबाघाटावर वळणावर हा अपघात झाला. या अपघातात कार 400 फूट दरीत कोसळली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र बजेट : भाजपच्या 12 निलंबित आमदारांपैकी एक आमदार विधानसभेत, गदारोळ नंतर कामकाज तहकूब