Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धर्मवीर चित्रपटाचा शेवट मुख्यमंत्र्यांनी टाळला

धर्मवीर चित्रपटाचा शेवट मुख्यमंत्र्यांनी टाळला
, सोमवार, 16 मे 2022 (11:24 IST)
सध्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावरील धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाची चर्चा असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील हा चित्रपट पाहण्यासाठी हजेरी लावली होती. परंतु त्यांनी चित्रपटाचा शेवट बघणे टाळले. चित्रपटाच्या शेवटी आनंद दिघेंचा अपघात झाल्यावर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येतं हे दाखवले आहे. हा भाग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बघणे टाळले ते म्हणाले आनंद दिघे यांचा मृत्यू शिवसेनाच नाही तर ठाण्यासाठी देखील मोठा आघात होता. 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईच्या चित्रपट गृहात शिवसेनेच्या मोजक्या नेत्यांसह हजेरी लावली. चित्रपट गृहात त्यांचे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपट पहिला मात्र त्यांनी चित्रपटाचा शेवट बघणे टाळले त्यात आनंद दिघे यांचा अपघाताचे क्षण दाखवण्यात आले होते. आनंद दिघे यांच्यावरील उपचार आणि त्या दरम्यान हृदय विकाराने झालेला त्यांचा मृत्यू हे दाखविण्यात आले होते.  हा भाग त्यांनी पाहणे टाळले आणि चित्रपट अर्धवट पाहता चित्रपट गृहाच्या बाहेर पडले. 

बाहेर आल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून चित्रपटाचा शेवट हा दुःखद असून मी पाहू शकलो नाही. आनंद दिघे यांचे आमच्या मधून जाणे हे मोठा आघात होता. नेहमी दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद देणाऱ्या आनंद दिघे यांची भूमिका साकारणारे प्रसाद ओक यांची भूमिका आनंद दिघे हे व्यक्तिमत्त्व जिवंत करणारी आहे. प्रत्येक शहरात आनंद दिघे सारखा शिवसैनिक असला पाहिजे. प्रत्येकाने हा चित्रपट पाहावा असा हा चित्रपट असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेतकऱ्याला भाव मिळाला नाही , 200 क्विंटल कांदा मोफत वाटला