Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्रानी असे वाचविले दोन तरुणांचे प्राण

मुख्यमंत्रानी असे वाचविले दोन तरुणांचे प्राण
, मंगळवार, 20 जुलै 2021 (15:24 IST)
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या हस्ते पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा आज पहाटे पार पडली. मुसळधार पाऊस आणि खराब वातावरणामुळे मुख्यमंत्री या महापुजेसाठी भर पावसामध्ये स्वत: ड्राइव्हिंग करत सोमवारी रात्री पंढरपूरमध्ये दाखल झाले. मात्र या प्रवासादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या मार्गामध्ये एका गावात दोन बाईकस्वारांचा अपघात झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली आणि त्यांनी या तरुणांना वाचवण्यासाठी तातडीची मदत पाठवल्याने या तरुणांचा प्राण वाचले.
 
झालं असं की,सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरेंसोबत पंढरपूरकडे रवाना झाले. या प्रवासादरम्यान मुख्यमंत्र्यांचा ताफा पंढरपूरच्या पंचक्रोषीमध्ये असणाऱ्या करंबक गावाजवळ आला असता येथे दोन बाईकस्वारांचा भीषण अपघात झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली. त्यांनी तातडीने आपल्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांची एक गाडी आणि रुगणवाहिका या तरुणांच्या मदतीसाठी पाठवली. या सुरक्षा रक्षकांनी केलेल्या मदतीमुळे आणि रुगणवाहिकेमुळे अपघातग्रस्त तरुणांना वेळीच उपचार मिळाले आणि त्यांचे प्राण वाचले. केवळ मदत न पाठवता पंढरपूरमध्ये पोहचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: या तरुणांच्या प्रकृतीची चौकशी केली.मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे दोन तरुणांचे प्राण वाचले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यात मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथकाची स्थापना