सध्या थंडीचा जोर सर्वत्र कायम आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून उत्तर भारतात तर थंडीचा जोर वाढला आहे.
महाराष्ट्रातही अनेक शहरे गारठली आहेत. राज्यामध्ये धुळे जिल्ह्यात रविवारी सर्वाधिक कमी तापनाची नोंद झाली. धुळे जिल्ह्यातील तापमान रविवारी 7 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. त्यामुळे जिल्ह्यात चांगलाच गारठा वाढला होता. पुढील 48 तास ही थंडीचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
मध्य मराठवाड्यात देखील तापमानात घट होऊन थंडीचा जोर वाढणार आहे. राज्यात काही भागात थंडी वाढल्यामुळे धुक्याची चादर पसरली आहे. मुंबई- गोवा पनवेल वडखळ माणगाव येथे धुक्याची चादर पसरलेली बघायला मिळाली. थंडीचा जोर वाढणार असून राज्यात शीतलहरची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने सांगिलते आहे.