खान्देशवासियांची कुलस्वामिनी असलेल्या एकविरा देवी मंदिर प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. दरवर्षी उत्साहात आणि हजारो भाविकांच्या सा७ीने होणारा चैत्र नवरात्रोत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सरकारने लागू केलेले निर्बंध या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
येथील पांझरा नदीच्या काठावर खान्देश कुलस्वामिनी श्री एकविरा देवीचे मंदिर आहे. चैत्र व नवरात्रोत्सवात येथे यात्रोत्सव साजरा केला जातो. यात्रोत्सवासाठी खान्देशासह मध्यप्रदेश व गुजरात राज्यातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. राज्यातील पाचवे शक्तीपीठ म्हणूनही या स्थानाची ओळख आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही चैत्र नवरात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. या उत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. त्यानिमित्ताने मोठी आर्थिक उलाढाल होते. ती यंदा ठप्प होणार आहे.