मुंबईतील दादरमध्ये अंगावर झाड पडून एकाचा मृत्यू झाला आहे. दिनेश सांगळे (३८) असं व्यक्तीचं नाव आहे. दिनेश सांगळे गुरुवारी दुपारी जेवण्यासाठी दादर पूर्व भागात आले होते. फुटपाथवरुन चालत असताना, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालाय परिसरात, त्यांच्या अंगावर झाड कोसळलं. पावणे चारच्या सुमारास ही घटना घडली.
या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.