Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने घेतला हा निर्णय

चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने घेतला हा निर्णय
, सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (21:19 IST)
दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण, सोन्याचे दागिने आदी चोरूण नेल्याच्या अनेक घटना नगर शहरासह जिल्ह्यात घडू लागल्या होत्या.
या घडलेल्या घटनांचा शोध लावण्यासाठी व अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलिसांनी दोन स्वतंत्र पथके स्थापन केले आहेत.
अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे हे या पथकांचे नेतृत्व करणार आहेत. विशेष म्हणजे या पथकांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेत अनेक वर्षे काम केलेल्या आणि गुन्ह्यांची उकल करण्याचा हातखंडा असलेले सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ, सहाय्यक फौजदार संजय खंडागळे, पोलीस हवालदार बापूसाहेब फोलाणे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
दरम्यान गेल्या काही डिबवसांपासून नगर शहर आणि परिसरात पायी जात असलेल्या महिलांच्या गळ्यातले दागिने धूमस्टाईलने ओरबाडून नेणे आणि नागरिकांच्या हातातली पैशांची बॅग हिसका देऊन नेण्याचे प्रकार घडले होते.
या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली होती. अखेर वाढत्या घटनांना रोख बसावा यासाठी अखेर पोलीस प्रशासनाने कठोर पाऊले उचलली आहे.ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी दोन स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुलगी पळून गेल्यामुळे बापाची आत्महत्या