Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तर डॉक्टरांचा परवाना रद्द करण्यात येईल

तर डॉक्टरांचा परवाना रद्द करण्यात येईल
, बुधवार, 12 ऑगस्ट 2020 (08:14 IST)
राज्यात अनेक ठिकाणी अवाजवी शुल्क आकारून कोरोना रुग्णांची आर्थिक लूटमार होत आहे. ही लूटमार थांबवण्यासाठी रुग्णालयांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या लुटमारीत डॉक्टरांचा सहभाग आढळल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिला.
 
राज्यात खासगी रुग्णालयांच्या दरावर नियंत्रण आणण्यात आलं. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी आल्याने प्रत्येक रुग्णालयात लेखापरीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. शिवाय, अवाजवी शुल्कवसुली केल्यास रुग्णांना पैसे परत देणे, दोषी रुग्णालयांवर गुन्हे दाखल करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. लूटमारीच्या अनेक प्रकरणांमघ्ये डॉक्टरांचा सहभाग नसून रुग्णालय व्यवस्थापनाचा हात असल्याचं आढळलं आहे. मात्र, अशा प्रकरणांमध्ये डॉक्टरांचा सहभाग आढळला तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतीय सैन्य कुठल्याही स्थितीसाठी सज्जः सीडीएस बिपीन रावत