Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वानखेडेंच्या पहिल्या पत्नीचे वडील आले माध्यमांसमोर, म्हणाले समीर वानखेडेंचं कुटुंब आधी मुस्लिम होत

वानखेडेंच्या पहिल्या पत्नीचे वडील आले माध्यमांसमोर, म्हणाले समीर वानखेडेंचं कुटुंब आधी मुस्लिम होत
, गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (17:08 IST)
क्रूझ शिपवरील ड्रग्ज पार्टीवर छापा टाकून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला  अटक करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे सध्या वादात सापडले आहेत. समीर वानखेडेंनी मुस्लिम धर्म स्वीकारला. त्यांनी एका मुस्लिम तरुणीशी विवाहदेखील केला. मात्र नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी दलित असल्याच्या प्रमाणपत्राचा वापर केला, असा खळबळजनक आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला. त्यानंतर आता वानखेडेंच्या पहिल्या पत्नीचे वडील माध्यमांसमोर आले आहेत. 
 
समीर वानखेडेंचं कुटुंब आधी मुस्लिम होतं. ते मुस्लिम नसते, तर त्यांचं आणि माझ्या मुलीचं लग्न झालंच नसतं, असा दावा वानखेडेंच्या पहिल्या पत्नीचे वडील डॉ. जाहीद कुरेशी यांनी केला. समीर वानखेडेंचं कुटुंब पूर्वी मुस्लिम होतं. माझी मुलगी शबाना कुरेशीसोबत त्यांचा विवाह मुस्लिम धर्माच्या रितीरिवाजानुसार संपन्न झाला होता. समीर वानखेडेच्या वडिलांचे नाव दाऊद होतं. समीरच्या बहिणीचंही लग्न मुस्लिम कुटुंबात झालं आहे, असं डॉ. जाहीद यांनी सांगितलं.
 
समीर वानखेडेंचं कुटुंब हिंदू होतं याबद्दल आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती. हे प्रकरण माध्यमांमध्ये आलं, तेव्हा आम्हाला ही गोष्ट समजली. समीर यांची आई खूप चांगली होती. त्यांच्याशी आमचे खूप चांगले संबंध होते, असं जाहीद म्हणाले. आम्हाला या प्रकरणात अधिक काही बोलायचं नाही. समीर वानखेडे हिंदू असताना त्यांच्याशी मुलीचं लग्न कसं लावलंत अशी विचारणा होत असल्यानं मी आमची बाजू मांडत आहे, असं म्हणत जाहीद कुरेशी यांनी वानखेडेंबद्दल अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारला उपहासात्मक टोला