शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी सोमवारी जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या म्हणजे 24 फेब्रुवारीला जाहीर होणार असून, दुसरी यादी 28 फेब्रुवारीला जाहीर करणार असल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घोषणा केली आहे.
महाविकास आघाडी सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येत्या तीन महिन्यांत ही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. पहिल्या सरकारची कर्जमाफीची योजना अजूनही सुरू आहे. त्यामुळे सर्व गोष्टी पूर्ण करूनच पुढे जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तर गिरणी कामगारांच्या घरासाठी 1 मार्च रोजी लॉटरी निघणार आहे. 35 लाख शेतकर्यांच्या कर्जखात्यांची यादी तयार केली असून, टप्प्याटप्प्याने कर्ज-माफीची अंमलब-जावणी करणार आहे.