Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ठाण्यात म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण , राज्यात रुग्ण संख्या 200

ठाण्यात म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण , राज्यात रुग्ण संख्या 200
, मंगळवार, 11 मे 2021 (17:23 IST)
दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात म्युकर मायकोसिसचे २०० रुग्ण आढळले असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनातून बरे झालेल्यांना म्युकर मायकोसिस हा बुर्शीजन्य गंभीर आजार होत आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यात या आजाराचा पहिला रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर देखील होत असून यामध्ये रुग्णांचे डोळे निकामी होत असल्याचा प्रकार समोर येत आहे.
 
ठाण्यात आढळला म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण आढळला असून म्युकोरमायकोसिस झालेल्या या महिलेवर उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय. काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात ५६ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली. ती महिला कोरोनावर उपचार घेत असताना तिच्या उजव्या डोळ्याची हालचाल होत नसल्याचे समोर आले. याची रुग्णालयाने गांभीर्याने दखल घेत त्या महिलेच्या काही चाचण्या करून घेतल्या. या चाचणीच्या रिपोर्टमधून त्यांना म्यूकरमायकोसिस या आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेवर कोरोनाचे उपचार जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरु आहे. त्यावेळी त्यांचा उजवा डोळा लाल झाल्याचे दिसून आले. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी नेत्र विभागाशी संपर्क साधला. त्यावेळी जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी त्या महिला रुग्णांची तपासणी केली. त्यावेळी त्या महिलेचे डोळे वर आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. तसेच त्यांच्या उजव्या डोळ्याची हालचाल होत नव्हती. तसेच लाईट दाखवल्यानंतर देखील त्यांच्या डोळ्यातील बाहुलीची कोणतीच हालचाल होत नव्हती. त्यानंतर त्यांचे सिटीस्कॅन, ओर्बिट ब्रेन सिटी स्कॅन करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या उजव्या डोळ्याच्या मास पेशींना सूज असल्याचे दिसून आले. या सर्व बाबींवरून त्या महिलेला म्युकोरमायकोसिस हा आजार झाल्याचे स्पष्ट झाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अनिल देशमुख यांच्याविरोधात CBI नंतर ईडीकडून गुन्हा दाखल