महाराष्ट्र सरकारने केंद्राच्या मदतीने रेल्वेद्वारे इतर राज्यांतून ऑक्सिजन आणण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर महाराष्ट्रातील मुंबई, कळंबोली येथून ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टनमला रवाना झाली होती. विशाखा पट्टनमला वैद्यकीय लिक्विड ऑक्सिजन टँकरमध्ये भरल्यानंतर ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्राच्या दिशेने रवाना झाली होती. आता ऑक्सिजन एक्सप्रेस राज्यात दाखल झाली आहे. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ऑक्सिजन एक्सप्रेस गोंदिया जंक्शनमध्ये दाखल झाली यानंतर ८.१५ वाजता नागपूरमध्ये दाखल झाली आहे.
राज्यात दाखल झालेल्या ऑक्सिजन एक्सप्रेसवर एकूण ऑक्सिजनचे ६० टॅंकर ठेवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, नागपूर अशा जिल्ह्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात ऑक्सिजन रेल्वेला जलद वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे.