Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एमबीबीएस, बीडीएससह अन्य काही अभ्यासक्रमांच्या पहिल्या फेरीची निवड यादी २८ ऑक्टोबरला जाहीर होणार

एमबीबीएस, बीडीएससह अन्य काही अभ्यासक्रमांच्या पहिल्या फेरीची निवड यादी २८ ऑक्टोबरला जाहीर होणार
, बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (15:48 IST)
सरकारी, अनुदानित, खासगी विनाअनुदानित, अल्पसंख्याक संस्थामधील एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस अशा आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. २२ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरता येणार आहे. एमबीबीएस, बीडीएससह अन्य काही अभ्यासक्रमांच्या पहिल्या फेरीची निवड यादी २८ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.
 
वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश ‘नीट यूजी २०२२’ची परीक्षा १७ जुलैला झाली आणि या परीक्षेचा निकाल ७ सप्टेंबरला जाहीर झाला. त्यानंतर जवळपास दीड महिन्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया जाहीर झाली. या प्रवेश प्रक्रियेंतर्गत राज्यातील सरकारी, अनुदानित, महापालिका, खासगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक संस्थांमध्ये आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया राज्य सरकारच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) नुकतीच जाहीर केली आहे. देशपातळीवरील रँकमधील विद्यार्थी ऑनलाइन नावनोंदणी करू शकतील.
 
आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक
एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी, बी (पी अँड ओ), बीएस्सी नर्सिंग अशा अभ्यासक्रमांसाठी या अंतर्गत नोंदणी करता येणार आहे. ऑनलाइन नोंदणी नसल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी करून घेणार नसल्याचे परीक्षा कक्षातर्फे सांगण्यात आले. जाहीर केलेल्या वेळापत्रकात केंद्र व राज्य सरकार, न्यायालय, एमसीसी, एएसीसीसी यांच्या सूचनांनुसार बदल होऊ शकतो, असेही या कक्षाने अधोरेखित केले आहे.

 ऑनलाइन नोंदणी (सर्व अभ्यासक्रमांसाठी) : २२ ऑक्टोबरपर्यंत
 नोंदणी शुल्क भरणे (ऑनलाइनच्या साह्याने) :  २३ ऑक्टोबरपर्यंत
 प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे :  २४ ऑक्टोबरपर्यंत (सायंकाळी पाच वाजेपर्यंत
उपलब्ध जागांचा तपशील जाहीर करणे (ग्रुप ए - एमबीबीएस, बीडीएस. ग्रुप सी- बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी, बीपी अँड ओ, बी.एस्सी (नर्सिंग) : २० ऑक्टोबर
ऑनलाइन अर्जात प्राध्यान्यक्रम देणे (ग्रुप ए आणि ग्रुप सी) : २१ ते २७ ऑक्टोबर
तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे : २५ ऑक्टोबर
पहिल्या फेरीसाठी विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करणे : २८ ऑक्टोबर
प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करणे : २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर
 विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी हे संकेतस्थळ : https://cetcell. mahacet.org
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खड्ड्यांवरुन भुजबळ संतप्त; १ नोव्हेंबरपासून टोल बंद पाडण्याचा इशारा