Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 5 April 2025
webdunia

पद मिळविण्यासाठी यात्रा सुरु केलेली नाही : आदित्य ठाकरे

journey
, गुरूवार, 18 जुलै 2019 (16:12 IST)
नवा महाराष्ट्र घडवायचा असून जन आशीर्वाद यात्रा सुरु केली आहे असं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. मला कोणतं तरी पद हवं आहे म्हणून मी ही यात्रा सुरु केलेली नाही असंही आदित्य ठाकरे यांनी यात्रेमागचा उद्देश सांगितला त्यांनी स्पष्ट केलं. जळगावातल्या पाचोराहून या यात्रेला सुरुवात झाली. 
 
ज्या मतदारांनी मतं दिली त्या सगळ्यांचेच आभार मानायचे आहेत. त्यांची मने जिंकायची आहेत असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. माझे आजोबा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तरी त्यांनी मला हेच सांगितले असते की ज्यांनी आपल्याला निवडणुकीत मतदान केले आहे त्यांचे आभार मानण्यासाठी जा. त्यासाठी कोणताही मुहूर्त पाहू नकोस, त्यामुळेच तारीख, वार, मुहूर्त न पाहता मी ही यात्रा सुरु केली आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

युतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलाच : चंद्रकांत पाटील