Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सातारातील कोयना परिसर भूकंपाने हादरला

सातारातील कोयना परिसर भूकंपाने हादरला
, मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (18:07 IST)
साताऱ्यातील कोयना धरण परिसरात आज सकाळी 9:47 वाजेच्या सुमारास भुकंम्पाचे झटके जाणवले रिश्टर स्केलवर तीव्रता 3.3 नोंदली गेली. गेल्या महिन्याभरात हा भूकंपाचा दुसरा धक्का होता. पाटण तालुक्यात कोयना धरणात सतत भूकंपाचे धक्के जाणवत असतात. आज मंगळवारी 9:47वाजेच्या सुमारास साताऱ्यातील कोयना परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. कोयनापासून सुमारे 9.6 किलोमीटर अंतरावर या भुकंम्पाचा केंद्रबिंदू होता. या पूर्वी 8 जानेवारीला देखील कोयना परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. रिश्टर स्केल वर याची तीव्रता 2.9 इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून सुमारे 8 किलोमीटर होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पीआर श्रीजेशने इतिहास रचला, वर्ल्ड गेम्स अॅथलीट ऑफ द इयर पुरस्कार जिंकला