Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कामगारांच्या न्यायहक्कांसाठी "दि म्युनिसिपल युनियन ची" स्थापना

कामगारांच्या न्यायहक्कांसाठी
मुंबई , सोमवार, 11 डिसेंबर 2017 (12:05 IST)
अध्यक्षपदी शशांक राव यांची, तर सरचिटणीसपदी रमाकांत बने यांची नियुक्ती 
 
कामगारांच्या दबलेल्या, दडपलेल्या आवाजामध्ये न्यायहक्कांसाठी लढण्याचा आत्मविश्वास पुन्हा एकदा जागविण्यासाठी तसेच कामगारांच्या एकजुटीची प्रेरणा देणारा संघर्ष महाराष्ट्रातील इतरही कामगारांना मिळण्यासाठी नुकताच शिरोडकर सभागृह, परळ, मुंबई येथे 'दि म्युनिसिपल युनियन ' या कामगार संघटनांची स्थापना करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातील नागरिक सेवा देणाऱ्या कामगार, कर्मचारी, अधिकारी, कंत्राटी कामगार,पेन्शनर,असुरक्षित कामगार यांच्यासाठी मुंबई महानगरपालिकेतील कामगार, कर्मचारी, अधिकारी, यांनी नोंदणी करून अलोटगार्दीच्या निर्धार मेळव्यात संघटनेच्या नावाचे अनावरण करून या सर्व कामगार अधिकाऱ्याप्रति सेवाव्रत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 
webdunia
सदर मेळाव्यात या कामगार संघटनेला आशीर्वादित / शुभेच्या देण्यासाठी भारतीय जनता पार्टी चे नेते आमदार मा. आशिष शेलार, जेष्ठ कामगार नेते विश्वास उटगी, सेवा निवृत्त उपनिबंधक श्रमिक संघ श्री. किनिंगे, दिवंगत कामगार नेते मा. शरद राव यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती शांता राव, कामगार नेते सर्वश्री रविराज आणि त्यांचे सहकारी, रिक्षा चालक-मालकांचे नेते श्री प्रमोद घोणे व त्यांचे सहकारी, विडी - तंबाखू व्यापारी संघाचे श्री नंद कुमार हेगिष्टे, गुमास्ता कामगार युनियनचे नेते श्री किरण पवार, मुंबई हॉकर्स युनियनचे नेते श्री आजमभाई आणि सहकारी, कॅप्टन अॅड. एस. जी शिरोडकर, गोवा मुक्ती संग्रामाचे नेते श्री. जगदीश काका तिरोडकर, बेस्ट कामगारांचे नेते सुहास नलावडे, घाडीगावकर, बाबा ईनामदार, दिनेश सिह, मुंबई फायर सर्व्हिसेस  युनियनचे नेते श्री देविदास लोखंडे, म्युनिसिपल डॉक्टरांचे नेते डॉ. क्षीरसागर, डॉ. शिंदे इ. मान्यवर उपस्थित होते. 
 
दि म्युनिसिपल युनियन, मुंबई महानगरपालिकेतील प्रथम क्रमांकाची कामगार संघटना बनविण्यासाठी मी या संघटनेच्या पाठीशी कायमचा उभा आहे आणि महानगरपालिकेतील कामगार, कर्मचारी, अधिकारांच्या कोणत्या हि प्रश्नासाठी मी या संघटनेला सर्वतोपरी सहकार्य करणार असा आशीर्वाद माननीय आशिष शेलार यांनी दिला. या संघटनेच्या कायदेशीर मदतीसाठी माझा मुलगा अॅड. अजित किनिंगे कोणतेहि मानधन न घेता कायम दिला आहे. या भावनोत्कट शब्दात श्री. किनिंगे यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. दि म्युनिसिपल युनियन ची स्थापना करून अतिशय योग्य असा राजकीय निर्णय केला आहे. असे मत श्री विश्वास उटगी यांनी व्यक्त केले. श्री रमाकांत बने आणि सहकाऱ्यांसोबत अहोरात्र मी मेहनत करणार आहे. अशी घोषणा बेस्ट उपक्रमाचे निवृत सहा महाव्यवस्थापक श्री सुहास नलावडे यांनी केली.   
 
श्री रमाकांत बने आणि श्री शशांक राव यांनी 'दि म्युनिसिपल युनियनच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे अनेक दैनंदिन आणि धोरणात्मक प्रश्न सोडवत असताना, संघटनेच्या सभासदांना मोफत कायदेशीर सहाय्य, व्हिक्टीमायझेशन सहाय्य, विविध प्रकारचे प्रशिक्षण आणि निवृत्त कामगार कर्मचारांच्या प्रश्नांवर संपूर्ण मदत देण्याचा संकल्प केला आहे. या निर्धार मेळाव्यामध्ये 'दि म्युनिसिपल युनियन'च्या मुंबई महानगरपालिकेच्या विविध खाते अंतर्गत कार्यरत असलेल्या जवळपास १४०० कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवून येत्या काही दिवसात या संघटनेची मोठ्या प्रमाणावर सभासद नोंदणी करण्याचा निश्चय केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन