Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

येवल्यातील जनतेने माझा 'नायलॉन मांजा' सारखा दोर पक्का केलाय-छगन भुजबळ

chagan bhujbal
, सोमवार, 15 जानेवारी 2024 (09:12 IST)
नाशिक मध्ये महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ अनुपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ हे येवल्यात पतंगोत्सवाचा  मनमुराद आनंद लुटताना दिसून आले. राजकीय फटकेबाजी करत त्यांनी पतंगोत्सवाचा शुभेच्छा दिल्या. माझा येवल्यातील पतंग कोणीही कापू शकत नाही, सरकारने नायलॉन मांजा वापरू नये असे सांगितले आहे, मात्र येवल्यातील जनतेने माझा 'नायलॉन मांजा'  सारखा दोर पक्का केलाय, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

यावेळी कोणी कितीही नायलॉन मांजा वापरला तरी माझ्यावर काही फरक पडणार नाही. येवला-लासलगाव लोकशक्तीचा मांजा भक्कम आहे. नायलॉन वापरावर बंदी आहे तरी काही लोक त्याचा वापर करतात असा टोला भुजबळांनी आपल्या येवल्यातील विरोधकांना लगावला.
 
यावेळी ते म्हणाले, मी येवल्यात अनेक वेळा पतंग उडवायला आलो आहे. पतंग उडवल्या आहेत, अनेकांचे पतंग कापले आहे. यापुढेही येथेच राहणार आहे. अनेकांचे पतंग कसे कापायचे त्याचे ट्रेनिंग घेतले असल्याचे सांगत भुजबळांनी आपल्या विरोधकांना इशारा यावेळी दिला.
 
बीड येथील सभा आटपून भुजबळ  येवल्यात आले आणि त्याचे स्वागत पतंगावर असलेल्या फोटो त्यांना मुलांनी दिल्या.

Edited by -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

56 व्या राष्ट्रीय परिषदेत पेपर पाठवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नोंदणी करण्याचे आवाहन