मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. पुढच्या ४८ तासांत मुंबई शहर, उपनगर आणि उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर विदर्भातल्या काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेने दिला आहे. विदर्भावरील कमी दाबाचं क्षेत्र वायव्येकडे सरकल्याने राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढच्या ४८ तासांत मुंबई शहर, उपनगर आणि उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर विदर्भातल्या काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेने दिला आहे. मुंबईत जुलैमधील ४४ वर्षांतील सर्वाधिक पाऊस सोमवारी रात्री पडला. २४ तासांत रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली. दिंडोशी परिसरात सर्वाधिक ४८१ मिमी पावसाची नोंद झाली.