Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पीएसीएल इंडिया लिमिटेडमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरु

money
, बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (14:53 IST)
गुंतवणूकदारांसाठी अत्यंत मोठी गुडन्यूज आहे. अनेक गुंतवणूकदारांनी पर्ल्स (Pearls) नावाने ओळखल्या जाणाऱ्या पीएसीएल इंडिया लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केली होती. देशभरातील लाखो गुंतवणूकदारांचा पैसा या कंपनीत अडकलेला आहे. या कंपनीचे जाळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागापर्यंत पसरले होते. त्यामुळेच अनेक गुंतवणुकदारांनी या कंपनीत पैसा गुंतवण्याचा निर्णय घेतला होता. आता या कंपनीच्या गुंतवणुकदारांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे.
 
गुंतवणुकदारांच्या पैसे परत मिळत नसल्याने या कंपनीचा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचला होता. त्यानंतर निवृत्त न्यायमूर्ती लोढा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पर्ल्सच्या गुंतवणूकदारांसाठी परतावा योजनाही आणली होती. त्यासाठी अनेकांकडून गुंतवणूकीचे प्रमाणपत्र जमा करुन घेण्यात आले आहे. आता या योजनेत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना रक्कम मिळण्याची आशा वाढली आहे. त्यांच्या खात्यात लवकरच गुंतवणुकीचा पैसा परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सेबीने याविषयीची माहिती दिली आहे.
 
पीएसीएल इंडिया लिमिटेडमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे, असा दावा सेबीने केला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी १५००० रुपयांसाठी दावा दाखल केला होता, त्यांना गुंतवणुकीची रक्कम परत करण्यात येत आहे. ही प्रक्रिया सुरु झाली आहे. गुंतवणूकदारांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.
 
याबरोबरच, ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचे प्रमाणपत्र ही दिले आहे. पण त्यांच्या अर्जात काही त्रुटी राहिल्या आहेत, अथवा चुका झाल्या आहेत. त्यांना ऑनलाईन यामध्ये दुरुस्ती करता येणार आहे. ही दुरुस्ती घरबसल्या करता येईल. पीएसीएल गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा देण्याची प्रक्रिया जानेवारी २०२०पासून सुरु आहे. त्यावेळी ५००० रुपयांचा परतावा देण्यात आला. पुढील वर्षी जानेवारी २०२१मध्ये गुंतवणूकदारांना १०००० रुपयांचा परतावा देण्यात आला. तर आता यापेक्षा जास्त गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यात येणार आहे. १०००१ रुपयांपासून ते १५००० रुपयांपर्यंतच्या गुंतवणूकदारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. एप्रिल २०२२पासून ही प्रक्रिया सुरु झालेली आहे.
 
अर्जात त्रुटी असल्यास..
तुम्ही केलेल्या अर्जात त्रुटी असल्यास किंवा अर्ज करताना चूक झाली असल्यास sebipaclrefund.co.in या वेबसाइटवर जाऊन ती दुरुस्त करता येणार आहे. त्यासाठी ३१ जानेवारी २०२३ पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर तुम्हाला संधी मिळणार नाही. तर ज्यांच्या खात्यात रक्कम आलेली नाही. त्यांना दुरुस्तीसाठी एक ठराविक कालावधी देण्यात आला. त्यांना तोपर्यंत दुरुस्ती केल्यास त्यांचा १५००० रुपयांपर्यंतच्या दाव्याचा निपटारा करण्यात येणार आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बायकोकडे परपुरुषाने पाहू नये म्हणून तिचे टक्कल केले सोलापुरची घटना