Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राणा दाम्पत्याची रात्र पोलीस ठाण्यात जाणार

राणा दाम्पत्याची रात्र पोलीस ठाण्यात जाणार
, शनिवार, 23 एप्रिल 2022 (22:04 IST)
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. या दांपत्याची  शनिवारची रात्र पोलीस ठाण्यातच जाणार आहे. त्यांच्यावर पोलिसांनी कलम १५३ (अ) अंतर्गत कारवाई करत, गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय आणखी काही कलमं देखील लावण्यात आलेले आहेत. उद्या त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
 
अटक करण्यात आल्यानंतर  न्यायालयात हजर करण्या अगोदर त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. खार पोलीस स्टेशनबाहेर शिवसैनिकांनी मोठ्यासंख्यने गर्दी केली आहे. याचबरोबर राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात खार पोलिसांकडेच तक्रार नोंदवली असल्याचे देखील समोर आले आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नारायण राणे यांचा इशारा म्हणाले राणाला बाहेर काढणार, बघुया कोण येतं तिकडे, मर्द आहेत ना या तिकडे