Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चर्चा तर होणारच कारण त्याने ठेवला आपल्या बाईकवर ड्रायवर

The reason could be discussed
, शनिवार, 15 जून 2019 (10:39 IST)
सध्या कार घेणे आणि त्यात ड्रायवर ठेवणे हे थोडे महागडे काम आहे. अनेक नागरिक स्वतः कार चालवतात मात्र श्रीमंत लोक ड्रायवर ठेवतात. मात्र सोलापूर येथे चित्र जरा उलटे आहे. एका अवलियाने चक्क दुचाकीसाठी ड्रायवर पगारी ठेवला आहे. जिल्ह्यात या चर्चा जोरदार आहे. मोहन चवरे असं त्यांचं नाव आहे. त्यांनी दत्ता पवार यांना दुचाकीवर ड्रायव्हर म्हणून नेमणूक केली  आहे. या दोघांची माढा तालुक्यातच नाही तर सोलापूर जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे. चवरे यांनी नवीन मोटार सायकल घेतली. मात्र मोहन यांना मोटार सायकल चालविणे जमलंच नाही. उलट मोटार सायकलवरुन आपण पडू की काय आणि अपघात होईल अशी जबर भीतीच त्यांच्या मनात बसली आहे. त्यामुळे हा त्रास नकोच नकोच म्हणून त्यांनी आपली मोटार सायकल चालवायला चालक ठेवला आहे. मोहन चवरे हे गेल्या 35 वर्षांपासून माढा शहरात सायकलवरुन पाणी वाटपाचे काम करत आहेत. ज्या नागरिकांचा फोन येतो त्यांच्या घरी पाणी वाटप करतात. त्यातूनच ते आपला उदरनिर्वाह भागवतात. मात्र नातेवाईकांच्या आणि  शहरातील कार्यक्रमांना जायचे झाल्यास त्यांना गाडीवरुन कोण घेऊन जात नव्हते. तेव्हा मात्र जिद्दीला पेटले आणि नवी दुचाकीच खरेदी केली. मात्र त्यांनी बाईक काही चालवता येईना. गाडी शिकण्यापूर्वीपासूनच त्यांनी दत्ता पवार यांना दुचाकीवर चालक म्हणून नेमलं. आता कोणतीही कामं असली तरी मोहन चवरे हे दत्ता पवारला घेऊन बाईकवरुन जातात.त्यामुळे या भावाची शहरात जोरदार चर्चा आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महिला सशक्तीकरणासाठी अर्थपूर्ण चित्रपट - रामदास आठवले