Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बारसकरविरुद्ध जरांगे यांच्यातील संघर्षाचा दुसरा अंक सुरू

बारसकरविरुद्ध जरांगे यांच्यातील संघर्षाचा दुसरा अंक सुरू
, रविवार, 25 फेब्रुवारी 2024 (10:23 IST)
दहा टक्के आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर मराठा आंदोलनात फूट पडल्याचे चित्र आहे. यातच अजय महाराज बारसकरांनी जरांगेंवर याआधी आरोप केले. त्यांना जरांगेंकडून उत्तर देण्यात आले. त्यानंतर आज पुन्हा एकदा बारसकरविरुद्ध जरांगे यांच्यातील संघर्षाचा दुसरा अंक सुरू झाला असून, दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
 
यावेळी बोलताना अजय महाराज बारसकर म्हणाले की, मी मराठा समाजाचा आहे. तरीही माझ्यावर अनेक आरोप करण्यात आले. जरांगेंनी तुकाराम महाराजाची माफी मागितली पण तीसुद्धा अंहकाराने. त्यांना दुसऱ्या दिवशी माझ्याबदद्ल विचारले. तर ते काय म्हणाले की, तो काय महाराज आहे का? बांधावर आला आणि महाराज झाला. त्याने बलात्कार केला, विनयभंग केला असे आरोप जरांगेंनी केले. मात्र या आरोपाला कुठलेच पुरावे नाहीत. असे अजय महाराज बारसकर म्हणाले.
जरांगेंच्या आरोपांना बारसकरांचे उत्तर
 
पुढे बोलताना अजय महाराज बारसकर म्हणाले की, जरांगेंनी माझ्यावर आरोप केला की, मी तिनशे कोटी रुपयांची माया जमा केली आहे. एवढ्या मोठ्या उंचीवरच्या आंदोलनकर्त्याने एवढा मोठा आरोप करणे चुकीचे आहे. त्यांनी दुसरा आरोप केला मी सरकारकडून 40 लाख रुपये घेतले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आर्थिक वादातून डॉक्टरांवर जीवघेणा हल्ला, प्रकृती चिंताजनक