Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रदर्शित झाला

uddhav thackeray
, बुधवार, 27 जुलै 2022 (15:14 IST)
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग  प्रदर्शित झाला आहे. त्यात त्यांनी अनेक बाबींचा खुलासा केला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल का, मुंबई महापालिका निवडणुकीचे काय, सध्या स्थापन झालेल्या सरकारबद्दल त्यांचे काय मत आहे, भुजबळांनी बाळासाहेबांना अटक का करावी लागली त्याचे राजकारण काय, बंडखोरांना कुठला दुसरा शब्द योग्य आहे यासह अनेक बाबींवर त्यांनी त्यांची मते व्यक्त केली आहेत. 

भुजबळांनी अटकेचा प्रयत्न केला असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला तेव्हा त्यांनी सगळ्या प्रकरणाचा खुलासा केला. त्यांची भेट झाली. तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की ठीक आहे आपलं वैर संपलं.
 
आज त्यांनी जे केलं तेच त्यांनी आधीच का केलं नाही. ठरल्याप्रमाणे केलं असतं तर आज अडीच वर्षं झाली होती. एक तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता किंवा त्यांचा मुख्यमंत्री झाला असता. बरं मी हेही सांगितलं होतं की तुम्ही पहिली अडीच वर्षं शिवसेनेला दिली तर ज्या तारखेला राजीनामा द्यायचा आहे त्या पत्रावर त्या मुख्यमंत्र्याची सही घेतली असती आणि त्याचं होर्डिंग करून मंत्रालयात लावलं असतं.
 
 
जे शिवसैनिक हिंदुत्वासाठी लढले, त्यांच्यामागे ईडी लावली. हा छळ कुठपर्यंत चालणार आहे? दुसरी गोष्ट म्हणजे भाजप सन्मानाची वागणूक कशी देणार आहे? आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी मी त्या दिवशी खासदारांनाही विचारली ती म्हणजे की अडीच वर्षं मातोश्रीबद्दल ज्या अशालाघ्य भाषेत बोलले असं बोलायची कोणाची हिंमत झाली नाही. त्याच्याबद्दल तुम्ही मधल्या काळात का बोलल्या नाहीत? एवढं सगळं तुमच्या नेत्याबद्दल बोलल्यावर तुम्ही शेपट्या घालून जाणार?
 
माझं इतकंच म्हणणं आहे माझा राग तुम्ही मुंबईवर काढू नका. पर्यावरणाचा घात होईल असं काही करू नका. आजही तिथे वन्यजीव आहेत. तुम्ही ते कांजुरला केलं तर ते अधिक लोकसंख्येसाठी वापरता येईल. आज ना उद्या तिथे करावंच लागणार आहे. मुंबईचा घात करू नका, नाहीतर मला असं म्हणावं लागेल की हे मुंबईबाहेरचे असल्याने यांना मुंबईवर प्रेम नाही की काय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Womens ODI World Cup : भारत 2025 मध्ये महिला वनडे विश्वचषक आयोजित करेल, आयसीसीने जाहीर केले