आज महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या वर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले,मला विचाराल तर हा भूकंप वगैरे मी मानत नाही. काही गोष्टी भविष्यात राजकारणात घडणार होत्या, त्या घडलेल्या आहेत, असं शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी म्हटलं.
अजित पवारांसोबत त्यांच्या लोकांनी शपथ घेतल्याचं आम्ही पाहिलं. याचा अर्थ स्पष्ट आहे, तो म्हणजे सध्याचं सरकार अस्थिर आहे. 165 आमदारांचा पाठिंबा असतानाही त्यांना अजित पवार आणि त्यांच्या 35 आमदारांची गरज लागते.
एकनाथ शिंदे यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्यानुसार ते अपात्र आहेत. हे सरकार घटनाबाह्य आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार आणि नंतर इतर आमदार अपात्र ठरतील. त्यामुळेच त्यांनी अजित पवार यांना सोबत घेतलं आहे.
शपथ घेतलेल्या अनेक लोकांविरुद्ध भाजपने मोहीम राबवली होती. त्यांचं भाजप आता काय करणार हा प्रश्न आहे.
पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत, त्यांचे आमदारही अपात्र होतील, हे सध्या स्पष्ट आहे
शिंदे हे आता जास्तकाळ मुख्यमंत्री नसणार पुढील काही दिवसांतच महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल.
आता राज्यात जे झाले या सर्व प्रकाराला लोकांचा अजिबात पाठींबा नाही. माझं शरद पवारांसोबत बोलणं झालं. ते खंबीर आहेत. त्यांनी चर्चा केली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचीही चर्चा झाली. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पुन्हा उभी राहील.
शिवसेनेच्या बाबतीत जे घडवलं, आता राष्ट्रवादीच्या बाबतीत जे घडवलं याला लोकांचा अजिबात पाठिंबा नाही, हे पुढच्या काळात दिसून येईल. त्यांनी या बाबत ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा बिडा काही लोकांनी घेतला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्यावे. जनता हा खेळ जास्त काळ सहन करणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे.त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले" मी खंबीर आहे.लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.". होय,जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही.