rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धावत्या दुचाकीने पेट घेतला, दुचाकीस्वाराचा होरपळून मृत्यू

The speeding two-wheeler caught fire
, शुक्रवार, 13 मे 2022 (17:12 IST)
नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील गुरेवाडी फाट्याजवळ एक धक्कादायक घटना घडली. धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतला या मध्ये चालकाचा होरपळून दुर्देवी  मृत्यू झाला. भीमा संतू कापडी (वय वर्ष 41)असे या मयत चालकाचं नाव आहे. 

मयत भीमा हे सिंन्नरच्या दिशेने जात असता त्यांच्या गाडीने अचानक पेट घेतला. त्यांना काही लक्षात येईल त्यापूर्वीच आगीने रोद्र रूप घेतले आणि भीमा हे त्या आगीच्या कचाट्यात आले. ते आगीत गंभीर रित्या भाजले असता त्यांना तातडीने उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु ते आगीत 90 टक्के होरपळाले होते. त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.  त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

RCB vs PBKS:शाहरुख खान पंजाब संघात प्रवेश करणार का? RCB विरुद्ध PBKS सामन्यातील संभाव्य प्लेइंग इलेव्हन अशी असू शकते