राज्यातील शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, तंबाखू आणि अमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी राज्य सरकार आता अधिक कठोर पावले उचलण्याची तयारीत आहे. गुटखा विक्रेते तस्कर आणि अवैध व्यवसायांशी संबंधितावर मोका लागू करता येण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची घोषणा विधानसभा हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली.
खरं तर सद्या लागू असलेल्या कायद्यांमध्ये गंभीर त्रुटी आहे. त्यामुळे गुटखा विक्रेत्यांची सहजपणे जामिनावर सुटका होते. याकडे अनेक आमदारांनी लक्ष वेधले. आमदार प्रशांत ठाकूर, अस्लम शेख, अभिमन्यू पवार, रईस शेख आणि अमीन पटेल यांनी शैक्षणिक परिसरात गुटखा विक्री वाढत असल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला.
या वर मुख्यमंत्री म्हणाले, गुटखा तस्करीत आणि विक्रीत मोका लागू करण्यासाठी अडचणी येत आहे.
गुन्हा संघटित पद्धतीने धमकी देणे किंवा सामूहिक इजा पोहोचविणे या निकषांमध्ये बसत नसल्याने विभागाकडून आक्षेप नोंदवण्यात आला. या कारणास्तव कायद्यात आवश्यक बदल करण्यात येईल.
मुख्यमंत्री म्हणाले, लवकरच मोका कायद्यात दुरुस्ती केली जाणार असून गुटख्यासारख्या आरोग्यास अपायकारक वस्तूंची अवैध विक्री आणि तस्करी कायद्याच्या कक्षात आणणार. या कायद्यात सुधारणा केल्यावर कडक कारवाई होणार असून गुटखा विक्रेत्यांना तात्काळ जामीन मिळणे कठीण होईल.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले, शाळा किंवा महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात विक्री आढळल्यास दुकाने व टपऱ्यांवर संयुक्त कारवाई होईल.
पोलिस आणि स्थानिक स्वराज्य संस्था एकत्रितपणे विशेष मोहीम राबवतील.
गुटखा बंदी पूर्णपणे अंमलात आणण्यासाठी कडक धोरण लागू केले जाईल.
गुटखा तस्करी आणि विक्री राज्यात कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. कायदा अधिक कठोर करून युवकांचे आरोग्य आणि शैक्षणिक परिसर सुरक्षित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. असे ते म्हणाले.