त्याचा मृत्यू, वर्तमानपत्रात बातमीही, मात्र या मृत चोराला पुणे पोलिसांनी जिवंत पकडले शिवाजी साटम काम करत होती ती सी. आय. डी. मालिका खूप प्रसिद्ध होती सोबतच त्यात पोलीस विविध गुन्हे यांची उकल करत असत, असाच एका मृत चोराच्या गुन्हा उकल महाराष्ट्र पोलीस त्यातही पुणे पोलिसांनी केली आहे.
काय आहे प्रकरण :
साधारण 1वर्षभरापूर्वी पुणे कोथरुड भागातून चारचाकी इर्टीगा कार चोरून मध्यप्रदेशात पसार झालेल्या चोरट्याने केलेल्या अनेक चोऱ्या व त्यातून अटकेपासून बचावासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला होता.
मृत्यू पेपरमध्ये बातमी
मध्यप्रदेशातील एका स्थानिक वर्तमानपत्रात त्याने नातेवाईकांमार्फत मृत्यूची बातमी छापून आणली. त्यानंतर तपासही थंडावला.
विवेक मिश्रा (रा. महेर, जि. सतना, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. मिश्रा याचे कोथरुड भागात पंक्चरचे दुकान होते. वर्षभरापूर्वी त्याने कोथरुडमधील सुतारदरा येथून कार चोरली. चोरी करुन तो मध्यप्रदेशातील मूळगावी गेला. त्यानंतर पोलिसांच्या तावडीत सापडू नये, यासाठी नातेवाईकांमार्फत स्वत:च्या मृत्यूची बातमी एका वर्तमानपत्रात छापून आणली होती.
प्राथमिक तपासात मिश्रा याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मध्यप्रदेशातील मिश्रा याच्या मूळगावी पोलिसांचे पथक गेले होते. तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली.
पोलिस ते पोलिस विश्वास कसे ठेवतील :
वृतपत्रातील मृत्यूच्या बातमीचे कात्रण त्यांनी तपास पथकाला दाखविले होते. मात्र, पोलिसांच्या तपासात मिश्रा हयात असल्याची माहिती मिळाली. तो चोरी केलेली कार स्वतः वापरत असल्याचे समजले. तसेच, कारवरील नंबरप्लेट बदलून मिश्रा हा पुण्यातील कोथरूड भागात येणार असल्याची माहिती तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी, अंमलदार अजिनाथ चौधर, संजय दहिभाते यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून मिश्राला ताब्यात घेतले. त्याच्याकडून वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक आयुक्त रुक्मिणी गलांडे, कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांच्या मार्गदर्शनाखाली अजय शिर्के, विष्णू राठोड, आकाश वाल्मिकी यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
कोणता होता गुन्हा :
स्वत:च्या मृत्यूचा बनाव करुन वावरणाऱ्या वाहन चोराच्या कोथरुड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी कडून वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. विवेक मिश्रा (रा. ता. महेर, जि. सतना राज्य मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
इर्टिगा :
कोथरुड पोलीस ठाण्यात इर्टिगा (एमएच 12 पी एन 7527) चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना विवेक मिश्रा याच्यावर संशय आल्याने पोलीस आरोपीचा शोधत होते. मात्र विवक मिश्रा ही व्यक्ती मयत असल्याची माहिती नातेवाईक, इतर मित्र परिवार तसेच स्थानिक वर्तमान पत्रातून पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीची शहनिशा केली असता विवेक मिश्रा हा जिवंत असल्याची माहिती समोर आले.
आरोपी विवेक मिश्रा हा वाहन चोरी करत असून त्याने कोथरुड येथून चोरलेली इर्टिगा नंबर बदलून वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच आरोपी चोरीची गाडी घेऊन कोथरुड येथे येणार असल्याची माहिती कोथरुड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला चोरीच्या गाडीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने पुणे ग्रामीण पोलिसांच्या पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अॅक्टिव्हा दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
मृत्यू झाल्याचा केला बनाव
मिश्रा याचे कोथरुड भागात पंक्चरचे दुकान होते. वर्षभरापूर्वी त्याने कोथरुडमधील पौड परिसरातून दुचाकी चोरली होती. चोरीनंतर मिश्रा मूळगावी गेला. त्याने पोलिसांपासून वाचण्यासाठी मध्यप्रदेशात नातेवाईकांमार्फत स्वत:च्या मृत्यूची बातमी एका वर्तमानपत्रात छापून आणली. मिश्राचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना प्राथमिक तपासात मिळाली होती. त्यानंतर मध्यप्रदेशातील मिश्रा याच्या मूळगावी पोलिसांचे पथक गेले होते. तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना नातेवाईकांनी दिली. वृतपत्रातील मृत्यूच्या बातमीचे कात्रण त्यांनी तपास पथकाला दाखविले होते, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले.
चोरटा पोलिसांच्या ताब्यात
मात्र, पोलीस चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना तपासात मिश्रा हयात असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली व त्याचा माग काढला. त्यावेळी तो चोरी केलेली दुचाकी वापरत होता. दुचाकीच्या वाहन पाटीवरील क्रमांक बदलून तो पुण्यात आल्याची माहिती तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक माळी व दहिभाते यांना मिळाली. त्यानंतर त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याकडून वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
Edited By- Ratnadeep Ranshoor