'वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो,' असं म्हणत महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवर यांनी लोणावळ्यात पार पडलेल्या ओबीसी चिंतन बैठकीतून शिवसेनेला टोले लगावले.
"मी अशा भागात राहतो, जिथे भरपूर वाघ आहेत. त्यामुळे माझ्या खात्यात पैसे आल्यास परत जाऊ देणार नाही," असं वडेट्टीवारांनी म्हटलं. त्यावर भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "एक वाघ नाना पटोले यांच्याकडेही पाठवा."
त्यावर उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले, "आम्ही वाघ पाठवू, पण तो वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो. कारण तो आमचा वाघ आहे."
यावेळी वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं की, "जेवढे पैसे सारथीला मिळतील, तेवढेच पैसे महाज्योतीला मिळतील. मी बसलोय इथं."
कोरोना संपल्यावर औरंगाबादमध्ये ओबीसींचा विराट मोर्चा होईल, अशी घोषणाही वडेट्टीवारांनी केली.