Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ट्रकने चाकांखाली चिरडले; दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार

ट्रकने चाकांखाली चिरडले; दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार
, गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (15:12 IST)
बारामती- पाटस रस्त्यावर सोनवडी सुपे फाट्यावर भरधाव ट्रकने दुचाकीवरील दोघांना चिरडले. या भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले. 
 
ही भयंकर घटना गुरुवारी सकाळी अकरा वाजून 15 मिनिटाच्या सुमारास घडली. या अपघातात काळूराम गणपत लोंढे (वय 60), शाकूबाई काळूराम लोंढे (वय 55) रा. देऊळगाव रसाळ ता. बारामती यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
 
मिळालेल्या माहितीप्रमाणे सकाळी सव्वा अकरा वाजेच्या दरम्यान माल ट्रक पाटसकडून बारामतीकडे भरधाव वेगाने धावत असताना ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि याच वेळी सोनवडी सुपे फाट्यावर बारामतीच्या दिशेने जात असलेली दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडले. अपघातानंतर ट्रकचा चालक व क्लिनर पळून गेले. या अपघातात मालाने भरलेल्या ट्रकखाली दुचाकी आणि पती- पत्नी दोघेही अडकल्याने स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले. ग्रामस्थांनी पोलिसांनी कळविल्यानंतर काही वेळातच तालुका पोलिस घटनास्थळावर दाखल झाले आणि क्रेनच्या साह्याने मृतदेह बाहेर काढले गेले. पुढील तपास केला जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये दाऊद का लिहिले ? : नवाब मलिक