देशात आणि राज्यात २ सप्टेंबर पासून देशाभरात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. मात्र या अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या उत्सवादरम्यान महाप्रसादातून घातपात होण्याची शक्यता राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने वर्तवली आहे.
यामुळे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने राज्यातील गणेश मंडळांना नोटीस जारी केली असून प्रसाद तयार करताना कोणती काळजी घ्यावी यासाठी काही सूचना केल्या आहेत. महाप्रसादात बाहेरील कोणतीही गोष्ट एकत्रित करण्याचा प्रयत्न होत असल्यास तस होऊ देऊ नये असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.
जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हा घातपात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे महाप्रसादाच वाटप करताना काळजी घ्या असे आवाहन राज्यातील गणेश मंडळांना करण्यात आले आहे.