राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढलेला आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करणं हा एक मार्ग आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लॉकडाऊन संदर्भात भाष्य केलं.
कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करणं हा एक मार्ग दिसतोय. मात्र, जनतेने त्याकाळी जसं सहकार्य केलं तसंच सहकार्य आता करतील अशी अपेक्षा आहे. माझी जनता नक्की सहकार्य करणार, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. जेव्हा सुरुवातीला कोरोना आला तेव्हा काही नव्हतं. आता लस आली आहे. स्वत:हून पुढे येऊन कोरोना लस घ्यावी, यानंतरही मास्क वापरावा. कोरोना लस कुठेही कमी पडणार नाहीत, संपूर्ण राज्यात लसीकरणाची केंद्र उघडली आहे. काही ठिकाणी केंद्र वाढवली आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.