बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडच्या धारूर येथे चार चोरटयांनी चक्क 2 मिनिटांत एसबीआयचे एटीएम मशीन फोडून चोरून नेले.ही सम्पूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या व्हिडीओ मध्ये दिसत आहे. चोरटे आधी एटीएम मध्ये शिरतात नंतर एटीएम दोरीने बांधतात. नंतर दोरी पिकअप व्हॅन ला बांधून ओढली. त्याने एटीएम उखडले आणि चोरटयांनी पिकअप व्हॅन वर भरून ते नेले.
एटीएम फोडल्यावर चोरटयांनी पिकअप व्हॅन मधून पळ काढला.चोरीची घटना समजतातच पोलिसांनी आणि बँकेच्या कर्मचारी सक्रिय झाले. पोलिसांनी 24 तास फिल्मी स्टाईलने चोरांचा पाठलाग केला.61 किलोमीटर पाठलाग केल्यावर पोलिसांनी एटीएम मिळवले मात्र चोरटे पसार झाले.
जप्त केलेल्या एटीएम मधून 21 लाख 13 हजार 700 रुपयांची रोकड सापडली आहे.चारही चोरटे फरार झाले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा शोध सुरु असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.