Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 13 March 2025
webdunia

केवळ सत्ता काबीज करत विजय मिळवण्यासाठीचा हा प्रयत्न : राज ठाकरे

केवळ सत्ता काबीज करत विजय मिळवण्यासाठीचा हा प्रयत्न : राज ठाकरे
, गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (16:16 IST)
बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीवर मी याआधीच पाच वर्षांपूर्वी या विषयावर बोललो होतो. प्रभागांसाठी अशी कोणतीही नाही. एक प्रभाग आणि एक उमेदवार हीच पद्धत देशात आहे. महाराष्ट्रात कशी कुठे ही पद्धत सुरू झाली ? सत्ता काबीज करण्यासाठीच हे प्रकार सुरू झाले. ही पद्धत योग्य नसल्याचेही मत त्यांनी मांडले. आमदार, खासदारांचाही एक प्रभाग करायचा का ? असाही प्रश्न त्यांनी यावेळी केला. म्हणून जनतेलाच विनंती आहे की लोकांनी निवडणूक आयोगाकडे आणि कोर्टाकडे जावे. ही  पूर्ण निवडणूकीची थट्टा केली आहे, असेही मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडले. नाशिक दौऱ्यात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 
 
सत्ताधाऱ्यांनी संपुर्ण निवडणूकीची थट्टा केली आहे. जनतेला फक्त गृहित धरूनच सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पण या सगळ्या प्रकारांविरोधात लोकांनी कोर्टात जायला हवे. अशा पद्धतीने प्रभागांची रचना करण्याचा सरकारचा नेमका काय उद्देश आहे ? गेल्या दहा वर्षात सत्ताधाऱ्यांकडून फक्त खेळ सुरू आहे. आपण फक्त हा खेळ बघत रहायचे असेही ते म्हणाले. ही प्रभागांसाठीची पद्धत योग्य आणि कायदेशीर नाही. निवडणूक आयोगानेच यावर कारवाई करायला हवी. हा कसला खेळ सुरू आहे असाही सवाल त्यांनी केला. ग्रामपंचायतीला अशी प्रभाग रचना चालत नाही, मग फक्त महापालिकेलाच का ? असाही सवाल त्यांनी केला.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, हत्यारे आणि स्फोटकांसहीत तीन जणांना अटक