Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हा तर राज्य सरकारच्या सूड भावनेने वागण्याच्या वर्तणुकीचा परमोच्च बिंदू : दरेकर

हा तर राज्य सरकारच्या सूड भावनेने वागण्याच्या वर्तणुकीचा परमोच्च बिंदू : दरेकर
, गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (16:46 IST)
राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांना विमान प्रवासाला मनाई करण्याचा प्रकार म्हणजे राज्य सरकारच्या सूड भावनेने वागण्याच्या वर्तणुकीचा परमोच्च बिंदू आहे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कोल्हापुरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
 
राज्यपालांना विमानातून उतरवण्याचा प्रकार माहीत नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. यासंदर्भात दरेकर यांना विचारले असता त्यांनी या मुद्द्यावरुनही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ‘उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीला इतकी महत्त्वाची घटना माहीत असे म्हणणे अर्धसत्य आहे. मुळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस या तिघांमध्ये वेगवेगळे निर्णय होत असतात. त्यांची एकमेकाला माहिती नसते,’ असा टोला दरेकरांनी लगावला आहे.
 
ट्विटरवरुनही दरेकर यांनी, “राज्यपालांच्या विमान प्रवासाला परवानगी नाकारून ठाकरे सरकारने प्रथा-परंपरांना हरताळ फासला आहे.हा सूड भावनेचा अतिरेक असून एवढ्या सूड भावनेने वागणारं सरकार आजपर्यंत पाहिलं नाही.राजकारण व सूड भावना समजू शकतो. पण राज्यपाल हे संविधानिक पद आहे,पदाची गरिमा राखली पाहिजे. मात्र सूडभावना किती नसानसात भरली आहे, हे ठाकरे सरकारने दाखवून दिलं,” अशी टीका केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चहा प्या आणि कप खा, झिरो वेस्ट तत्वावर कोल्हापूरच्या इंजिनिअर्सने तयार केले हे कप